WTC Final 2025 x
Sports

WTC Final : ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेचाही भुग्गा; फक्त १३८ धावांवर गारद, निकाल तिसऱ्या दिवशीच लागणार?

WTC Final 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ऑलआउट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १३८ धावा केल्या. आता पुन्हा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाली आहे.

Yash Shirke

World Test Championship चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

डावाच्या सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघावर वरचढ ठरले. दोन्ही सलामीवीर मोजक्या धावा करुन माघारी परतले. कॅमरन ग्रीन तिसऱ्या क्रमावर खेळण्यासाठी आला. त्याने फक्त ४ धावा केल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने क्लास दाखवला आणि त्याने खेळ सावरत ६६ धावा केल्या. हेडने फक्त ११ धावा केल्या. स्मिथनंतर ब्यू वेबस्टरने ७२ धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० पार नेली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या पाठोपाठ मार्को जॉन्सनने ३ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने ५६.४ ओव्हर्समध्ये २१२ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा संघ ऑल आउट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मैदानात उतरले. पण पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजरवूड या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर दबाव आणला. एक-एक करत दक्षिण आफ्रिकन खेळाडू बाद होत गेले. पहिल्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचे ४ गडी बाद केले होते. दुसऱ्या दिवशी देखील ऑस्ट्रेलियन गोलंदाज फॉर्ममध्ये दिसले. १३८ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमाने ३६ धावा, तर डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने सर्वाधिक ६ गडी बाद केले. पुन्हा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाली आहे.

दोन्ही संघांनी चांगली गोलंदाजी केली पण फलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. डावात दोन्ही संघ कमी धावांवर ऑलआउट झाल्याने पाच दिवस चालणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तीन दिवसांमध्येच संपेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता ऑस्ट्रेलिया पुन्हा विजेतेपद मिळवणार की दक्षिण आफ्रिका बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gotya Geete Beed : महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार गोट्या गीतेला राजकीय आश्रय? पोलिसांच्या भूमिकेवर संशय

Budhwar Upay: गणपती बाप्पाचा एक अचूक मंत्र आणि समस्या होतील दूर; बुधवारच्या दिवशी हे उपाय करायला विसरू नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Sambhaji Bhide Video : संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, १५ ऑगस्ट अन् भगवा झेंड्यावर केले वक्तव्य

Budget Smartphone: कमीत कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स! १ हजार रुपयांपेक्षा स्वस्त फोनमध्ये 4G, UPI आणि कॅमेरा

SCROLL FOR NEXT