wpl final 2024 delhi capitals enters in final of womens premier league after beating gujarat giants  twitter
Sports

WPL 2024: ७ चौकार अन् ५ षटकार! शेफालीच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्लीचा सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश

Delhi Capitals Enters In WPL Final : वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे

Ankush Dhavre

WPL 2024, Delhi Capitals:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनेने गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. दिल्लीकडून खेळताना शेफाली वर्माने धावांचा पाऊस पाडला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नाही. कारण संघातील सुरुवातीच्या ३ फलंदाजांना १० धावांचा आकडा देखील गाठता आला नाही. मात्र त्यानंतर फलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. भारतीने ४६ तर काथरीनने २८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरात जायंट्सने २० षटकअखेर १२६ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज होती. (Cricket news in marathi)

गुजरात जायंट्सने दिलेलं आव्हान मोठं नव्हतं. दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शेफाली वर्माने मैदानात येताच गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या डावात केवळ २८ चेंडूत तिने आपलं अर्धशतक पूर्ण केलं

तर ३७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. यासह गेल्या सामन्यातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यातही चमकली. तिने ३८ धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ७ गडी राखून आणि ४१ चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला.

दिल्ली कॅपिटल्स या हगांमातील फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडणार आहे. हा सामना १५ मार्च रोजी पार पडणार आहे. तर या सामन्यात विजय मिळवणारा संघ १७ मार्च रोजी होणाऱ्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT