WPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धमाकेदार एन्ट्री; गुजरात जायंट्सला चारली धूळ

WPL DC Beat GG 20th Match : वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्समध्ये झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला.
WPL 2024
WPL 2024x , Social Media

WPL 2024 DC Beat GG 20th Match :

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्समध्ये झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे त्यांची फायनलमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. (Latest Marathi News)

गुजरातची संघाची कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा संघ २० षटकात १२६ धावा करून गारद झाला. गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी गमावून १२७ धावा ठोकत सामना खिशात टाकला.

या स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची सुरुवात परावभावे झाली. तर शेवट देखील परभवाने झाला. गुजरात संघ ८ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकण्यास यशस्वी ठरला. तर गुजरातला ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं.

WPL 2024
Cricket News: महाराष्ट्राचा मुलगा गाजवतोय ओडिशाचं मैदान! मराठमोळ्या प्रीतची अंडर-१३ संघात निवड

दिल्लीने गुजरातचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर दुसरीकडे १५ मार्चला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगळुरुदरम्यान एलिमिनेटर सामना होणार आहे. या दोन्ही संघापैकी एक संघ हा फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळणार आहे.

WPL 2024
IPL 2024,Harry Brook: दिल्ली कॅपिटल्सचे ४ कोटी पाण्यात! IPL तोंडावर असताना स्टार खेळाडूची माघार

गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १२६ धावा केल्या. गुजरातने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने १३.१ षटकात ३ गडी गमावून १२९ धावा ठोकून सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये एन्ट्री मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मागील हंगमात देखील दिल्ली कॅपिटल्सने चांगली कामगिरी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com