Cricket News: महाराष्ट्राचा मुलगा गाजवतोय ओडिशाचं मैदान! मराठमोळ्या प्रीतची अंडर-१३ संघात निवड

Cricket News: क्रिकेटला कुठलीही सीमा नसते असं म्हटलं जातं. उत्तम खेळ असेल तर आपण कुठेही जाऊन, कुठल्याही संघात खेळून आपला ठसा उमटवू शकतो.
Cricket News
Cricket Newssaam tv news
Published On

Cricket News In Marathi:

क्रिकेटला कुठलीही सीमा नसते असं म्हटलं जातं. उत्तम खेळ असेल तर आपण कुठेही जाऊन, कुठल्याही संघात खेळून आपला ठसा उमटवू शकतो. असाच काहीसं घडलंय १२ वर्षीय प्रीतसोबत. वडीलांची बदली झाल्यानंतर खांबाळे कुटुंबाला महाराष्ट्र सोडून ओडिशाला जावं लागलं. वेगळं राज्य, वेगळी बोली सर्वकाही वेगळं होतं. मात्र प्रीतने आपल्या खेळातील कौश्यलाच्या बळावर ओडिशाच्या अंडर १३ संघात स्थान मिळवलं आहे.

प्रीतला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याचे वडील आपल्या कंपनीकडून क्रिकेट खेळायचे त्यामुळे त्यांना पाहून प्रीत प्रेरीत झाला. ३-४ वर्षांचा असताना तो TV वर क्रिकेट पाहायचा. प्रीतलाही क्रिकेटची आवड आहे, हे कळताच त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट क्लबमध्ये टाकलं. ४- ५ वर्षांचा असताना प्रीत आपल्या क्लबकडून खेळू लागला आणि इथूनच सुरु झाला प्रीतचा क्रिकेट प्रवास.

प्रीत सुरुवातीपासूनच कलिंगा नगर स्पोर्ट्स अॅकेडमीकडून खेळतोय. सध्या तो OCA (ओडीशा क्रिकेट असोसिएशन)च्या अंडर १३ संघाकडून खेळतोय . नुकताच तो OCA कडून आयोजित करण्यात आलेल्या Inter School cricket tournament 2024 स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या स्पर्धेत St. Marry School जयपुर संघाकडून खेळताना त्याने दमदार खेळ करुन दाखवला. अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रीतने गोलंदाजी करताना २ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर त्याने संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली आहे.

Cricket News
IND vs ENG 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! अंतिम कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात अश्विनसारख्याच घातक गोलंदाजाची एन्ट्री

कसा होता महाराष्ट्र ते ओडीशाचा प्रवास?

प्रीतच्या वडिलांचं शिक्षण मुंबईत झालं. इंजिनियरिंग झाल्यानंतर काही वर्ष ते भुषण स्टील खोपोली येथे कार्यरत होते. इथे कार्यरत असताना त्यांनी Jindal steels साठी मुलाखत दिली. त्यांचं ओडिशाला जाण्यासाठी सिलेक्शन झालं. हा जॉब लागल्यानंतर खांबाळे कुटुंब मुंबई सोडून ओडिशाला स्थलांतरीत झालं. ओडीशाला गेल्याच्या १ वर्षानंतर प्रीतचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने क्रिकेटची बॅट हातात घेतली. पवित्र मलिक यांनी त्याला घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. (Cricket news in marathi)

Cricket News
IND vs ENG: तीन सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतरही पाटीदारला पाचव्या कसोटीत का संधी द्यावी? दिग्गजाने सांगितलं कारण

भारतीय संघासाठी खेळण्याचं स्पप्न..

प्रीतला भविष्यात क्रिकेटमध्ये करियर करायचं आहे. सध्या तो ओडिशाच्या अंडर १३ संघाचं प्रतिनिधित्व करतोय. इथून पुढे त्याला ओडिशाच्या अंडर १६ आणि अंडर १९ संघाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्यानंतर रणजी क्रिकेट खेळून त्याला भविष्यात भारतीय संघासाठी खेळायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com