National Engineer's Day 2023 : 15 सप्टेंबरलाच इंजिनिअरिंग दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्व आणि थीम

National Engineer's Day : कोणत्याही देशाच्या बांधकामात इंजिनिअर्स महत्त्वाची भूमिका बजावतात.
National Engineer's Day 2023
National Engineer's Day 2023Saam Tv

National Engineer's Day 2023 :

कोणत्याही देशाच्या बांधकामात इंजिनिअर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. इंजिनिअर्सच्या योगदानामुळेच देशाची वाटचाल आणि प्रगती होत राहते. या इंजिनिअर्सच्या म्हणजेच राष्ट्रनिर्मात्यांच्या योगदानाचे स्मरण, कौतुक आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का राष्ट्रीय इंजिनिअरिंग दिवस 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो? इंजिनियर्स डे आणि या वर्षीच्या थीमबद्दल तुम्ही येथून संपूर्ण माहिती मिळवू शकता.

National Engineer's Day 2023
Engineering In Marathi: अभियांत्रिकी शिक्षणासाठी मराठी भाषेचाच बोलबाला...

आपल्या देशात, एम विश्वेश्वरयांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी इंजिनिअरिंग दिन साजरा केला जातो. एम विश्वेश्वरय्या यांना महान इंजिनिअर्सचा (Engineers) दर्जा आहे आणि म्हणूनच त्यांना 1955 मध्ये भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्यात आला. याशिवाय त्यांना ब्रिटिश नाइटहूड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. त्यांची जयंती, 15 सप्टेंबर हा राष्ट्रीय इंजिनिअरिंग दिवस म्हणून समर्पित करण्यात आला.

कोणताही दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी काही ना काही थीम ठरवली जाते. त्यानुसार तो दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय इंजिनिअरिंग दिन 2023 ची थीम 'Engineering for a Sustainable Future ' अशी निश्चित करण्यात आली आहे.

इंजिनिअर्सचा सन्मान करण्यासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही (Country) इंजिनिअरिंग दिन साजरा केला जातो, परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये तो वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. भारतात हा दिवस 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, तर त्याच्या शेजारील देश बांग्लादेशात हा दिवस दरवर्षी 7 मे रोजी, इटलीमध्ये 15 जून, इराण 24 फेब्रुवारी, रोमानिया 14 सप्टेंबर, बेल्जियम 20 मार्च रोजी साजरा केला जातो.

National Engineer's Day 2023
Engineering College : आत्महत्येपुर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने चिठ्ठीत लिहिलं...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com