मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच आपल्या खास रणनीतीसाठी ओळखला जातो, मग ती आयपीएल असो वा डब्ल्यूपीएल. वुमेन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनसाठी सुरू असलेल्या लिलावातही असेच काहीसे पहायला मिळाले. आफ्रिकन गोलंदाज शबनीम इस्माईलला घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू याच्यात चढाओढ पहायला मिळाली. यात गुजरात टायटन्सनेही उडी घेतली. मात्र अंतिमक्षणी मुंबई इंडियन्सने बाजी मारत १.२० कोटीची बोली लावत शबमीनला आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला संघात घेण्यासाठी तब्बल ८० लाख रुपये जादा मोजले आहेत.
आयपीएलच्या धरतीवर २०२२ मध्ये महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची दिमाखात सुरूवात झाली. यंदा महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू होत असून मुंबईत खेळाडुंची लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. विशेष म्हणजे महिला प्रीमियर लीगसाठी तब्बल १६५ खेळाडुंनी नोंदणी केली आहे, ज्यात १०४ भारतीय खेळाडुंचा समावेश आहे तर ६१ खेळाडू विदेशी खेळाडू आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
३५ वर्षीय शबमीन इस्माईल दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकासंघासाठी इस्माईलने ११३ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात ११२ डावांमध्ये १८.६२ च्या सरासरीने ५.७७ च्या इकॉनॉमी रेटने १२३ बळी घेतले आहेत. तर २२९१ धावा केल्या आहेत. तर १२ धावांत ५ बळी घेतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.