Mumbai Indians vs Delhi Capitals saam tv
क्रीडा

MI VS DC : मुंबई इंडियन्सची धमाकेदार सुरुवात, दिल्ली कॅपिटल्सला चारली धूळ; शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार लगावत जिंकला सामना

WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals: दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सला १७१ धावांचं आव्हान दिलं. यानंतर दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ६ गडी गमावत १७३ धावा ठोकत सामना जिंकला.

Vishal Gangurde

WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals:

महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे. या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात झाला. या दोन्ही संघामध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. (Latest Marathi News)

या सामन्यात दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सला १७१ धावांचं आव्हान दिलं. यानंतर दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ६ गडी गमावत १७३ धावा ठोकत सामना जिंकला. मुंबई इंडियन्सच्या सजीवन सजनाने विजयी षटकार लगावत सामना खिशात टाकला.

सजीवन सजना बनली स्टार

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघामध्ये रोमहर्षक सामना झाला. मुंबई इंडियन्सला दोन चेंडूत पाच धावा हव्या होत्या. चेंडू एलिस कॅप्सीच्या हातात होता. यानंतर विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हरमनप्रीत कौर ५५ धावांवर बाद झाली.

याआधी सलामीवर यास्तिका भाटियाने ५७ धावांची खेळी खेळली. या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर सजीवन सजनाने षटकार लगावत मुंबई इंडियन्सला सामना जिंकून दिला. एका चेंडूवर पाच धावांची गरज असताना सजीवनने विजयी षटकार लगावत सामना जिंकून दिला.

कर्णधाराने सजीवनचं तोंडभरून कौतुक

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरचं तोंडभरून कौतुक केलं. फिल्डिंग करताना सजनाला भरपूर बोलणे ऐकावे लागले. तिने सामन्यादरम्यान कॅप्सीचा झेल सोडला होता. पण शेवटच्या चेंडूवर सजीवन सजनाने षटकार लगावत सर्वांचं मन जिंकलं.

रोमहर्षक सामन्यात विजयी षटकार लगावल्याने मैदानातील क्रिकेट चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात कौतुक केलं. मुंबई इंडियन्स आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना पराभूत झाली नाही. आजही सामना जिंकून इतिहास रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT