WPL Match 2023
Sports

RCB-W Vs GG-W: अखेर गुजरातने उघडले खाते! अटीतटीच्या सामन्यात ११ धावांनी विजय; स्मृतीच्या RCB चा सलग तिसरा पराभव...

WPL : महिला प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात गुजरात संघाने विजय मिळवला.

Gangappa Pujari

Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants: महिला आयपीएलमध्ये आज गुजरात आणि आरसीबी यांच्यात सामना पार पाडला. या रोमहर्षक सामन्यात गुजरात संघाने ११ धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली बेंगलोरच्या संघाला सलग तिसरा पराभव स्विकारावा लागला. सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरूद्ध विजयासाठी 202 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान राजस्थानला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात धावांपर्यंतच मजल मारता आली. (Cricket News)

अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा हा पहिला विजय ठरला तर आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होय. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 201 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीचा संघ सहा बाद 190 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीकडून सोफी डिवायन हिने विस्फोटक खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

आरसीबीकडून सलामीवीर सोफी डिवाईननने 66 धावांची तर हेथर नाईटने 11 चेंडूत नाबाद 30 धावा करत जोरदार लढत दिली. मात्र ही लढत 11 धावांनी कमी पडली. अखेर गुजरातने सलग दोन पराभवानंतर विजयाचे खाते उघडले. तर स्मृती मानधनाच्या तगड्या आरसीबीला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली.

गुजरातने दिलेल्या 202 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली होती. स्मृती मंधाना आणि सोफी डिवायन यांनी 5.2 षटकात 54 धावांचा पाऊस पाडला होता. स्मृती 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि सोफी डिवायन यांनी डाव सावरला. पण मोक्याच्या क्षणी एलिसा पेरी बाद झाली. पेरीनं 32 धावांचं योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना सोफीने दुसरी बाजू लावून धरली होती. सोफी डिवायन हिने 45 चंडूत 66 धावांची खेळी केली.

तत्पुर्वी गुजरातनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातनं 20 षटकात 7 गडी गमवून 201 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होते. सोफिया डंकले आणि हर्लीन देओलच्या आक्रमक खेळीपुढे बंगळुरुचे गोलंदाज फिके पडले. सोफिया डंकलेनं 28 चेंडूत 65 धावा, तर हर्लीन देओलनं 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुछ तो बडा होने वाला है! एनडीएमधील बडा नेता राहुल गांधींच्या संपर्कात

Maharashtra Live News Update: सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील जंगली महाराज रस्ता जॅम

Rohit Sharma : आशिया कपआधी रोहित शर्मासाठी गुड न्यूज; फॅन्स छातीठोकपणे म्हणणार, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! ५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण; व्हिडीओ फोटोंसह पुरावे दिले

Dharashiv Crime : जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवलं; आधी गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT