Tur Price Per Quintal : तुरीला मिळाला उच्चांकी दर; बाजार समितीत आनंदाचे वातावरण

शेतक-यांनी टप्प्या टप्याने तूर विक्री केल्यास आर्थिक फायदा हाेऊ शकताे.
Latur , Tur Price
Latur , Tur Pricesaam tv
Published On

Tur Price : लातूर (latur) जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत (udgir krushi utpanna bazar samiti) तुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीचा दर उच्चांकी असण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून (traders) वर्तविली जात आहे. (Latur Latest Marathi News)

Latur , Tur Price
Yavatmal News : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; नाफेडने सुरु केली तूर खरेदी केंद्र; जाणून घ्या प्रक्रिया

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तुरीला सर्वाधिक आठ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (farmers) टप्या टप्याने तूर विक्री केल्यास आर्थिक फायदा होणार आहे.

Latur , Tur Price
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

सर्वसाधारण तुरीस ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. स्थानिक कारखानदारांकडून मागणी वाढल्याने आगामी काळात तुरीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी ६ हजार ५०० रुपये दर मिळाल्याने यावर्षी लागवड कमी झाली. अतिवृष्टीने तुरीस फटका बसल्यामुळे उत्पादन अत्यल्प झाले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com