Team India saam tv
Sports

Team India: वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराला टीममधून डच्चू; टी-२० संघाला मिळाला नवा कर्णधार

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरला नवा कर्णधार बनवण्यात आले असून सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे. हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाने आयर्लंड आणि इंग्लडच्या टी-२० सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यावेळी टी-२० टीमला नवा कर्णधार मिळाला आहे. श्रेयस अय्यरच्या खांद्यावर टी-२० टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. तर वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमारला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांपूर्वी सूर्यकुमार यादवला टी-२० कर्णधारपदावरून हटवलं जाण्याची शक्यता होती. अशातच सूर्याला हटवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत घेण्यात आला. इतकंच नाही तर वैभव सूर्यवंशीलाही पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलंय. आयर्लंड सिरीजसाठी त्याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

आयर्लंडविरुद्धच्या T20I सिरीजसाठी टीम इंडिया

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

इंग्लंडविरूद्ध टीम इंडियाचा T20I स्क्वाड

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवि बिश्नोई, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिंस यादव आणि वैभव सूर्यवंशी.

भारताचा आयर्लंड दौरा (जून)

• पहिला टी२० सामना: २६ जून, बेलफास्ट

• दुसरा टी२० सामना: २८ जून, बेलफास्ट

भारताचा इंग्लंड दौरा (जुलै)

• १ जुलै: पहिला टी२०, चेस्टर-ले-स्ट्रीट

• ४ जुलै: दुसरा टी२०, मँचेस्टर

• ७ जुलै: तिसरा टी२०, नॉटिंगहॅम

• ९ जुलै: चौथा टी२०, ब्रिस्टल

• ११ जुलै: पाचवा टी२०, साउथहॅम्प्टन

• १४ जुलै: पहिला वनडे सामना, बर्मिंगहॅम

• १६ जुलै: दुसरा वनडे सामना, कार्डिफ

• १९ जुलै: तिसरा वनडे सामना, लॉर्ड्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस

अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वतःच्या जमिनी घेतल्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Chanakya Niti : लग्नासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कसा असावा? आचार्य चाणक्यांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स

गावरान स्टाईल शेपूची भाजी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

धर्मांतरनंतर अनुसूचित जातीचे मिळतील की नाही? सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

SCROLL FOR NEXT