World Cup Points Table Saam Tv
Sports

World Cup Points Table: विजयामुळे दक्षिण आफ्रिकेची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप; ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले मागे

World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्येही मोठी उलटफेर झालीय.

Bharat Jadhav

World Cup Points Table:

मुंबईच्या वानखेडे मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धावांचा पाऊस पाडत इंग्लंडचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी कसा दावेदार आहे, हे दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १७० धावांवर ऑल आऊट झाले. (Latest News)

या वर्ल्ड कपमधील हा सर्वात मोठा विजय ठरलाय. या वर्ल्ड कपमध्ये एवढा मोठा विजय आतापर्यंत कोणत्याही संघाला मिळवता आला नाही. यामुळे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने २०१५ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानवर पर्थ येथे २७५ धावांनी विजय साकारला होता. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २२९ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्येही मोठी उलटफेर झालीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाईट्स टेबलमध्ये मोठे बदल

गेल्या काही दिवसांपासून वर्ल्डकपमध्ये सर्व संघ आपल्या प्रतिस्पर्धीला जोरदार टक्कर देत आहेत. या सामन्यांमध्ये नव-नवीन रेकॉर्ड नोंदवले जात आहेत. या रेकॉर्डसह वर्ल्डकपच्या पाईट टेबलमध्ये मोठे बदल होत आहेत. श्रीलंकेने नेदरलँडला पराभूत करत पाईट टेबलमध्ये इंग्लंडला देखील मागे टाकलं आहे. तर सर्वात तळाशी एका विजयासह अफगाणितास्तानचा संघ आहे.

World cup point table

अफगाणितास्तानच्या संघाला २ गुण आहेत. तर इंग्लंडच्या संघ शेवटून दुसऱ्या स्थानी असून त्यांनाही २ गुण आहेत. या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला फक्त एका सामना जिंकता आलाय. या पाईंट्स टेबलच्या अव्वलस्थानी न्युझीलंडचा संघ असून त्यांनी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ गुण मिळवलेत. तर दुसऱ्यास्थानी भारतीय क्रिकेट संघ आहे. टीम इंडियाने चार सामन्यात विजय मिळवला असून ८ गुण मिळाले आहेत. आज इंग्लंडला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ६ गुण मिळवलेत. या गुणांसह आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉक हा फक्त चार धावा करून बाद झाला. त्यानंतर रीझा हेंड्रीक्स आणि रॅसी व्हॅन डर दुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया तिथेच रचला होता. त्यानंतर मैदानात क्लासिनने वादळी खेळी केली. क्लासिनने धडाकेबाज शतक झळकावले.

त्याने ६७ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १०९ धावा केल्या. त्याचबरोबर मार्को जेन्सनने यावेळी फक्त ४२ चेंडूंत ३ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंडपुढे ४०० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ फक्त १७० धावांवर ऑल ऑऊट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT