World Cup 2023 Saam Tv
क्रीडा

World Cup 2023 News: पुण्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने किवींची उडवली दाणादाण, १९० धावांनी मिळवला विजय

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्युझीलंडच्या संघाचा पराभव केलाय.

Bharat Jadhav

World Cup 2023 south africa vs New Zealand :

पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं आव्हान पार करताना किवीच्या संघाची दमछाक उडाली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३५८ धावाची आव्हान दिलं होतं. ही धाव संख्या उभारताना आफ्रिकेने ४ विकेट गमवले होते. हा धावाचा डोंगर पार करताना किवीच्या संघाचे सर्व गडी १६७ धावांवर बाद झाले. (Latest News)

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १९० धावांच्या फरकाने न्युझीलंड क्रिकेट संघाचा पराभव केला. या विजयासह आफ्रिकेच्या संघाने या वर्ल्ड कपमध्ये ७ सामन्यांमध्ये ६ सामने जिंकले आहेत. यामुळे त्यांनी गुणतालिकेत १२ पाईट मिळवत पहिल्या स्थानी विराजमान झालीय. दरम्यान न्युझीलंडच्या संघाकडून फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वात जास्त ६० धावा केल्या. तर सलामीवीर विल यंगने ३३ धावा केल्या. त्यानंतर डेरेल मिचेल याने २४ धावा केल्या.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी न्युझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. क्विंटन डी कॉकने ११६ चेंडूत ११४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यात १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. तर व्हॅन डर डुसेनने ११८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर १३३ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. याशिवाय डेव्हिड मिलरने ३० चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची धमाकेदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या १० षटकात ११९ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टिम साउदीने ७७ धावांत २ बळी घेतले.

नाणेफेक जिंकल्यानंतर न्युझीलंडच्या कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. सुरुवातीला टॉम लाथमचा निर्णय योग्य ठरला, कारण डिकॉकला १५ षटकात फक्त एक चौकार मारता आला होता. तर पहिल्या पावर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त ४३ धावा करू शकला होता. यात कर्णधार टेम्बा बावुमाचे योगदान २४ धावांचे होते. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेल घेण्यापूर्वी त्याने मॅट हेन्रीवर चार चौकार आणि एक षटकार मारला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

Manoj Jarange News : कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे? मनोज जरांगे आज फैसला सांगणार!

Viral Video: AC ट्रेनमध्ये ही अवस्था; प्रवासी कोंबले, दरवाजाही लागेना! प्रत्येक प्रवाशाचे दुःख सांगणारा VIDEO

SCROLL FOR NEXT