आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. २०११ ची वर्ल्डकप स्पर्धाही भारतात पार पडली होती.
या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन्स बनवण्यात जहीर खानने मोलाची भूमिका बजावली होती.
जहीर खान आणि शाहीद आफ्रिदीने संयुक्तरित्या २१-२१ गडी बाद केले होते. आता भारतीय संघात देखील असा एक गोलंदाज आहे, जो जहीर खानच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो.
भारतात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे शाहिद आफ्रिदीने २१ गडी बाद करणं साहजिक आहे. मात्र याच स्पर्धेत जहीर खानने देखील २१ गडी बाद केले होते. यावेळी ही भारतीय संघात जहीर खान सारखा घातक गोलंदाज आहे.
जो विरोधी संघातील फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून मोहम्मद सिराज आहे.
आगामी वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदरी असणार आहे. भन्नाट गती आणि हवेत चेंडू फिरवण्याची क्षमता असलेला सिराज कुठल्याही फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवू शकतो.
मुख्य बाब म्हणजे तो सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्येही फलंदाजाला बाद करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे त्याची गोलंदाजी चालली तर तो एकट्याच्या जीवावर भारताला वर्ल्डकप जिंकून देऊ शकतो. (Latest sports updates)
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी..
आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात एकटा मोहम्मद सिराज श्रीलंकेवर भरी पडला होता. त्याने एकाच षटकात ४ गडी बाद केले होते. तर ७ षटक गोलंदाजी करत अवघ्या २१ धावा खर्च करत त्याने ६ गडी बाद केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.