न्यूझीलंडच्या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा Saam TV
Sports

World Cup 2023: न्यूझीलंडच्या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा; सेमीफायनलचा मार्ग झाला सोपा, जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Semi Final Scenario: न्यूझीलंडच्या या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Satish Daud

World Cup 2023 Semi Final Scenario

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघांमध्ये चुरस रंगली आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात अतिशय रंगदार सामना झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव केला. स्पर्धेतील पहिले ४ सामने जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्याचं दिसून आलं.

न्यूझीलंडच्या पराभवाचा पाकिस्तानला फायदा

दरम्यान, न्यूझीलंडच्या या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला बंगळुरू येथे पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.

या सामन्यात जो संघ बाजी मारेल, तो संघ सेमीफायनलच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकणार आहे. न्यूझीलंडचे सध्या ७ सामन्यांत ८ गुण आहेत. तर पाकिस्तानच्या नावावर ७ सामन्यांत फक्त ६ गुण जमा आहेत.

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचणार का?

जर पाकिस्तानने बेंगळुरूमधील सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला, तर त्याच्या खात्यात ८ गुण जमा होतील. न्यूझीलंडचेही ८ सामन्यांत केवळ ८ गुण होतील. जर पाकिस्तानने तो सामना ८३ धावांनी जिंकला किंवा धावसंखेचा पाठलाग ३५ षटकांपूर्वी केला तर ते न्यूझीलंडला नेट रनरेटच्या बाबतीत सुद्धा मागे टाकू शकतील.

न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा सामना

सध्या न्यूझीलंडचा +०.४८४ आणि पाकिस्तानचा - ०.०२४ आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान मोठ्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरू शकतो. दरम्यान, बेंगळुरूमधील सामन्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेसोबत तर पाकिस्तानचा कोलकातामध्ये इंग्लंडसोबत होणार आहे.

श्रीलंका आणि इंग्लंड या दोन्ही संघांना आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जवळपास सेमीफायनलची फेरी गाठली आहे.

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहचणार?

दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून दोघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर ६ सामन्यात ८ गुण जमा आहेत. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT