IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL Match Latest Updates
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अजेय आहे. टीम इंडिया एकमेव असा संघ आहे, ज्यांनी स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. ही भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे. सलग सहा सामने मोठ्या फरकाने खिशात घातल्यानंतर आता टीम इंडियाचा सातवा सामना गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताची वर्ल्डकपमध्ये विजयी सुरुवात
चेन्नईच्या चेपॉक येथील मैदानावर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला नमवून टीम इंडियाने (Team India) वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाला पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज सध्या चांगलेच लयीत आहेत.
टीम इंडियाला मोठा धक्का
दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेसोबत दोन हात करण्यापूर्वी बुधवारी भारतीय संघाने (Sport News) मैदानात चांगलाच घाम गाळला. पण, हा सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत आतापर्यंत अव्वल क्रमांकावर विराजमान होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या क्रमांकावर कब्जा
त्यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंडवर मोठा विजय साकारला. आफ्रिकेचा हा त्यांचा सहावा विजय असून त्यांच्या खात्यात 12 गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे समान 12 गुण झाले आहेत. पण वर्ल्ड कपमध्ये भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेचा रन रेट हा जास्त आहे.
टीम इंडिया श्रीलंकेवर भारी पडणार का?
त्यामुळे या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुणतालिकेत भारतीय संघाला धक्का दिला आहे. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. कारण भारतीय संघाला गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवता आलेले नाही. भारताने जर आजच्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला, तर ते पुन्हा अव्वल क्रमांकावर विराजमान होतील. नाहीतर, टीम इंडियाला पुढील काही दिवस दुसऱ्याच स्थानावर समाधान मानावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.