आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील तीन संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर आपलं सेमीफायनलमधलं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे सेमीफायनलसाठीच्या चारपैकी तीन संघांची नावे स्पष्ट झाली आहेत.
सलग ७ सामने जिंकून भारत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचं तिकीट मिळाले आणि आता ऑस्ट्रेलियानेही आपले स्थान निश्चित केले आहे. आता चौथ्या स्थानी कोण येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाने आतापर्यंत 8 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियानेही 8 सामने खेळून 6 जिंकले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल गाठण्यासाठी खरी स्पर्धा आहे. (Latest News)
भारतीय संघ पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि उपांत्य फेरीत त्यांना चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळावे लागेल. अशा परिस्थितीत न्यूझीलंड, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधील कोणताही एक संघ समोर असू शकतो. जर न्यूझीलंड संघाने श्रीलंकेचा पराभव केला तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर होतील.
जर न्यूझीलंड हरला आणि पाकिस्तानने इंग्लंडला हरवले तर उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानसोबत होईल. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला तरच अफगाणिस्तान पुढे जाईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.