AUS vs AFG Match: अफगाणिस्तानला 'ती एक' चूक भोवली; मॅक्सवेलने तिथेच फिरवला सामना, काय ठरला टर्निंग पॉइंट?

Australia vs Afghanistan Match: २२ व्या षटकात मॅक्सवेल ३३ धावांवर असताना मुजीब उर रेहमानने त्याचा सोपा झेल सोडला. मॅक्सवेलने या एका जीवदानाचा फायदा चांगलाच उचलला.
world cup 2023 AUS vs AFG Mujeeb ur Rahman drop glenn maxwell catch Afghanistan lost the match against australia
world cup 2023 AUS vs AFG Mujeeb ur Rahman drop glenn maxwell catch Afghanistan lost the match against australiaSaam TV
Published On

Australia vs Afghanistan Match

विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये अतिशय रंगदार सामना झाला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सनी विजय मिळवला. मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने धडाकेबाज द्विशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

एकवेळ अफगाणिस्तान हा जिंकणार असं वाटत होतं. मात्र, एका चुकीने त्यांनी हा सामना गमावला. मॅक्सवेल वादळापुढे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. सेमीफायनलच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांचा डोंगर उभा केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

world cup 2023 AUS vs AFG Mujeeb ur Rahman drop glenn maxwell catch Afghanistan lost the match against australia
World Cup : मॅक्सवेलचा बिग शो; पायाला दुखापत झाली असतानाही ठोकलं द्विशतक

अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने शतकी खेळी केली. याशिवाय शेवटच्या काही षटकात राशीद खानने सुद्धा फटकेबाजी केली. २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांनी पहिल्या पावरप्लेमध्येच एकापाठोपाठ एक ४ विकेट्स गमावल्या.

हेड, मार्श, इंग्लिश, वार्नर, लाबुशेन आणि स्टॉयनिस यांनी आपली विकेट फेकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती ६ बाद ८७ अशी झाली होती. त्यानंतर मॅक्सवेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सावध फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

मात्र २२ व्या षटकात मॅक्सवेल ३३ धावांवर असताना मुजीब उर रेहमानने त्याचा सोपा झेल सोडला. मॅक्सवेलने या एका जीवदानाचा फायदा चांगलाच उचलला. कारण, त्यानंतर मॅक्सवेलने द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात पॅट कमिन्सचाही मोलाचा वाटा होता. मॅक्सवेल फटकेबाजी करीत असताना कमिन्स एका बाजूने आपली विकेट सांभाळून होता. दरम्यान, या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे मॅक्सवेलचे हे जीवदान ऑस्ट्रेलियासाठीच नाही तर या संपूर्ण सामन्यासाठी महत्वाचे ठरले. मुजीबने केलेली एक चूक अफगाणिस्तानच्या चांगलीच अंगलट आली. त्यामुळे अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

हा क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला. त्यामुळे हा एकच चेंडू अफगाणिस्तानचा संघ कधीच विसरणार नाही. कारण या एका चेंडूमुळे त्यांना पराभव पत्करावा लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक चेंडू सामना कसा फिरवू शकतो, याचे उत्तम उदाहरण यावेळी पाहायला मिळाले.

world cup 2023 AUS vs AFG Mujeeb ur Rahman drop glenn maxwell catch Afghanistan lost the match against australia
Rashi Bhavishya Today: या राशींच्या लोकांना धनप्राप्तीचे उत्तम योग; नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com