World Cup 2023 india vs new-zealand Match prediction toss winner team win today match ssd92 Saam TV
Sports

IND vs NZ Toss: भारत-न्यूझीलंड सामन्यात टॉस ठरणार बॉस; मॅच जिंकण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

IND vs NZ Match Updates: वर्ल्डकपमध्ये आज टीम इंडियाचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. या सामन्यात टॉस हा बॉस ठरण्याची शक्यता आहे.

Satish Daud

IND vs NZ Match Updates

वर्ल्डकपमध्ये आज टीम इंडियाचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. या सामन्यात टॉस हा बॉस ठरण्याची शक्यता आहे. टॉसनंतर चुकीचा निर्णय घेतल्यास दोन्ही संघांवर सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करायची की फलंदाजी? हा प्रश्न दोन्ही संघाच्या कर्णधारांसमोर असणार आहे. (Latest Marathi News)

वर्ल्डकप स्पर्धेत भारताने (Team India) आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडनेही विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघ मजबूत असल्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. २००३ नंतर वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही.

त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आपली खराब कामगिरी सुधारण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे टीम इंडियाला पराभूत करुन सेमीफायनलच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकण्याचा न्यूझीलंडचा (IND vs NZ Match) प्रयत्न राहिल. दरम्यान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन धरमशाला येथील स्टेडियममधील परिस्थिती लक्षात घेता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कारण, बर्फाळ प्रदेश असल्याने धरमशाला येथे सायंकाळनंतर दव पडतो. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणे फार कठीण होते. याचा जबरदस्त फायदा फलंदाजांना होतो आणि धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे जाते. न्यूझीलंडकडे चांगले वेगवान गोलंदाज असून त्यांची फिरकी गोलंदाजी देखील चांगली आहे.

अशातच नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीचे निमंत्रण द्यायचे आणि मिळालेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करायचा असा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. याबाबत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सुद्धा पत्रकारपरिषदेत भाष्य केले होते. भारत-न्यूझीलंड संघात दवाची भूमिका महत्त्वाची असू शकते. यात लपवण्यासारखे काही नाही, असं द्रविड यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

SCROLL FOR NEXT