Mahad Tourism : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

Shreya Maskar

हिवाळी ट्रिप

हवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कावळ्या किल्ल्याला आवर्जून भेट द्या. येथे तु्म्हाला भन्नाट वातावरण अनुभवता येईल.

fort | google

कावळ्या किल्ला

कावळ्या किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात, पुणे-रायगड सीमेवर वरंधा घाटात वसलेला एक प्राचीन गिरिदुर्ग आहे.

fort | google

उद्देश

कावळ्या किल्ला वरंधा घाटाच्या रक्षणासाठी आणि टेहळणीसाठी वापरला जात होता. जो कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.

fort | google

परिसर

कावळ्या किल्ल्याच्या माथ्यावर वाघजाई देवीचे जीर्ण मंदिर, पिण्याच्या पाण्याच्या काही टाक्या आणि पडक्या अवस्थेतील बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. हा गड पावसाळ्यात अनेक धबधब्यांनी वेढलेला असतो

trekking | yandex

ट्रेकिंग

कावळ्या किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील हिरवाई, धबधबे आणि सह्याद्रीच्या रांगा डोळ्यांचे पारणे फेडतात.

trekking | yandex

इतर नावे

कावळ्या किल्ला 'वरंधा घाटाचा पहारेकरी' म्हणून ओळखला जातो. वीकेंडला येथे नक्की ट्रिप प्लान करा.

fort | google

निसर्ग सौंदर्य

कावळ्या किल्ला पावसाळ्यातील ट्रेकिंग, सह्याद्री पर्वतरांगेच्या विहंगम दृश्यांसाठी आणि जवळ असलेल्या धबधब्यांसाठी ओळखला जातो. येथे तुम्हाला पक्षी निरीक्षण करायला मिळेल. तसेच येथे भन्नाट फोटोशूट करा.

fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

NEXT : मुरुड-जंजिरा किल्ल्याचे खरं नाव काय?

Murud-Janjira | SAAM TV
येथे क्लिक करा...