World Cup Semi Final Saam Tv
Sports

World Cup Semi Final : टीम इंडियाचा 'दस का दम'!; शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला लोळवून फायनलमध्ये एन्ट्री

World Cup : योग्य रणनीती आखत टीम इंडियाने सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं आणि वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

Bharat Jadhav

India Enter in World Cup Final At Ahmedabad :

रोहित शर्माची धमाकेदार सुरुवात, शुभमन गिलची वेगवान अर्धशतकी खेळी, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ठोकलेलं तडाखेबंद शतक, त्यानंतर गोलंदाजीत हुकुमाचा एक्का असलेल्या मोहम्मद शमीनं घेतलेल्या ७ विकेट या 'टीम वर्क'मुळं टीम इंडियानं बलाढ्य आणि वर्ल्डकपमधला सर्वात मोठा 'अडथळा' समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला सेमिफायनलमध्ये ७० धावांनी पराभूत केलं. या विजयासह रोहित सेनेने वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.(Latest News)

या विजयासह भारतीय संघानं न्यूझीलंडने २०१९ मध्ये मँचेस्टरमध्ये केलेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला. त्यावेळी वर्ल्डकप सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने त्या पराभवाचा वचपा काढला.

वर्ल्डकप विजयापासून एक पाऊल दूर

आता भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली असून, हा महामुकाबला १९ नोव्हेंबरला गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. फायनलमध्ये भारताचा सामना दुसऱ्या सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

दुसरा सेमिफायनलचा सामना गुरुवारी, १६ नोव्हेंबरला कोलकात्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असतील. दोघेही तगडे संघ आहेत. या सेमिफायनलमधील विजेत्या संघाशी भारत फायनलमध्ये भिडणार आहे. आता तो संघ कोणता असेल, याबाबत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आहे.

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, के एल राहुल, शुभमन गिल यांनी जोरदार फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या संघासमोर ३९८ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान पार करताना किवींच्या फलंदाजांवर दबाव होता. परंतु डॅरिल मिचेलने तडाखेबाज खेळी करत ११९ चेंडूत ९ चौकार ७ षटकार मारत १३४ धावा केल्या. परंतु त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघाला ४८.५ षटकात ३२७ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT