वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
आज न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. मात्र, 'करो या मरो' सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा सेमी फायनलचा मार्ग आता खडतर बनला आहे. याचा मोठा फायदा पाकिस्तान संघाला होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वात जास्त संधी ही न्यूझीलंडच्या संघाला आहे. कारण न्यूझीलंडच्या संघाने ८ सामने खेळले आहे. या ८ सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने चार सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
त्यामुळे आता न्यूझीलंडच्या खात्यात ८ गुण आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने सुद्धा ८ सामन्यात ४ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात ८ गुण जमा आहे. त्यामुळे सेमीफायनच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला, तर त्यांचे सेमीफायनलचे तिकीट जवळपास कन्फर्म होणार आहे. कारण, न्यूझीलंडचे नेटरनरेट पाकिस्तानपेक्षा अधिक चांगले आहे. मात्र, न्यूझीलंडचा जर पराभव झाला, तर त्याचा मोठा फायदा पाकिस्तान संघाला होणार असून त्यांचा सेमीफायनलच मार्ग आणखी सोपा होऊ शकतो.
न्यूझीलंड आणि पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानचा संघही सेमी फायनलच्या शर्यतीत आहे. आज न्यूझीलंडला कुठल्याही परिस्थिती श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकणं गरजेचं आहे. पण, हा सामनाच जर झाला नाही तर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये कसा काय पोहचू शकतो, ही सर्वात मोठी गोम आहे.
कारण आजचा सामना हा बेंगळुरुत होणार आहे. या सामन्यात पावसाचा पाऊस खोड घालण्याची शक्यता आहे. गुरुवारी बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर न्यूझीलंडला एकच गुण मिळेल आणि त्यामुळे त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. याचा मोठा फायदा पाकिस्तानला होईल, त्यांनी पुढील सामना जिंकल्याच सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.