भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील पाचवा सामना सुरू आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज आहे.
चेपॉकमध्ये भारतीय फिरकीपटूंचा दबदबा..
चेपॉकमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला होता. सलामीवीर मिचेल मार्श शून्यावर माघारी परतला.
त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने संघाचा गाडा पुढे नेत अर्धशतकी भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ४६ तर डेव्हिड वॉर्नर ४१ धावा करत माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने २७, ग्लेन मॅक्सवेलने १५ धावांची खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्स अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)
चेपॉकवर फिरकी गोलंदाज चमकले..
ऑस्ट्रेलियन फलंदाज या सामन्यात उतरण्यापूर्वी आर अश्विनच्या गोलंदाजीचा सराव करून उतरला होते. मात्र कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या सामन्यात आऊट ऑफ सिलॅबस आल्याचे दिसून आले आहे.
रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. तर कुलदीप यादवने २ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २ फलंदाजाला बाद केलं आहे .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.