World Cup 2023 Icc
क्रीडा

World Cup: दबक्या पावलांनी पठाणांची टीम आली अन् पाकिस्तानची शिकार केली...; वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर

Bharat Jadhav

World Cup Point Table:

आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानच्या संघाला पाणी पाजलं. चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला ८ विकेटनी पराभूत केलं. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांनी पराभूत करत सर्व क्रिकेट रसिकांना धक्का दिला. त्यानंतर अफगाणच्या पठाणांनी पाकिस्तानचं पानीपत केलं. या विजयासह अफगाणिस्तानने पाईंट् टेबलदेखील धक्का दिला. (Latest News)

वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. याआधी दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले होते. त्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानला २८३ धावांचे आव्हान दिले. मागील सामन्यांचा निकाल पाहता अफगाणिस्तानसाठी हे आव्हान मोठे होते. परंतु अफगाणच्या पठाणांनी अभ्यास जोरात केला होता. त्याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानला पराभूत केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झारदान यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदार करून विजयाचा पाया रचला. गुरबाजने ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांसह ६५ धावा केल्या. गुरबाज आणि झारदान यांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागिदारी केली.

world cup point table

पाईट्स टेबलमध्ये बदल

अफगाणिस्तानच्या या विजयामुळे पाईंट टेबलमध्ये सर्वात मोठा बदल झालाय. सर्वात तळाशी असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने थेट ६ व्या क्रमांकावर झेप घेतलीय. तर गतविजेत्या इंग्लंडला तळाशी जावं लागलं आहे. इंग्लंडच्या वरती गुणांसह श्रीलंकेचा संघ आहे. वर्ल्डकपच्या पाईंट टेबलमध्ये भारतीय संघ १० गुणासह अव्वलस्थानी कायम आहे.

तर दुसऱ्या स्थानी न्युझीलंडचा संघ आहे. त्यांना १० गुण आहेत. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ असून त्यांच्याकडे ६ गुण आहेत. तर चौथ्यास्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांच्याकडे ४ गुण आहेत. त्यानंतर पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानच्या संघाला ४ गुण मिळाले आहेत. त्यानंतरच्या क्रमांकावर म्हणजेच ६ व्या स्थानावर अफगाणिस्तानचा संघ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT