parth salunkhe 
Sports

धनुर्विद्येत भारताचा डंका, ८ सुवर्णांसह १५ पदके; पार्थ चमकला

Siddharth Latkar

सातारा : पाेलंड येथे झालेल्या जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत World Archery Youth Championships भारतीय संघाने Indian Team १५ पदकांसह आठ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारतीय पुरुषांच्या संघात साता-याच्या पार्थ साळूंखे याचा समावेश आहे.

जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आठ सुवर्ण, दाेन रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली आहेत. रविवारी स्वातंत्र्यदिनी भारताने 18 वर्षांखालील रिकर्व्ह प्रकार स्पर्धेत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकली. भारताच्या कॅडेट रिकर्व्ह मिश्रित टीम तमन्ना आणि विशाल चांगमाईने जपानचा ६-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. जागतिक स्पर्धेत आत्तापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीय तिरंदाजांचे अभिनंदन केले. त्यांना खेळाडूंना भावी वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचे हे यश जास्ती जास्त युवकांना धनुर्विद्या शिकण्यास आणि त्यात उत्कृष्ट यश मिळवण्यास प्रेरित करेल असेही माेदींनी नमूद केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

स्पर्धेतील चाैथ्या दिवशी रिर्कव्हमध्ये २१ वर्षाखालील गटात दुहेरीत काेमालिका बारी आणि पार्थ साळूंखे या भारतीय संघाच्या जाेडीने स्पेनला ५-३ ने हरवून सुवर्णपदकावर माेहाेर उमटवली. तसेच स्पर्धेतील तिस-या दिवशी रिर्कव्हमध्ये २१ वर्षाखालील मुलांच्या पार्थ साळूंखे, आदित्य चाैधरी, धीरज बाेम्मादेवरा या खेळाडूंनी स्पेनच्या संघास ५-३ ने नमवित सुवर्णपदक जिंकले.

ऑलिम्पिकमध्ये साता-याच्या प्रवीण जाधवच्या कामगिरीनंतर पार्थने parth salunkhe मिळविलेले यश क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT