India Women Hockey Team Saam TV
Sports

महिला हॉकी विश्वचषक : नवनीत कौरच्या २ गोलमुळे भारताचा शेवट गोड; जपानवर ३-१ ने विजय

भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा 3-1 असा पराभव केला.

साम टिव्ही ब्युरो

टेरेसा : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र, नवनीत कौरने केलेल्या दोन गोलमुळे भारताने आपला शेवट गोड केला. भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा 3-1 असा पराभव केला. हा विजय मिळवून सुद्धा भारतीय संघ महिला विश्वचषक स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला. जपान विरुद्धच्या सामन्यांत नवनीत कौरने 30 व्या आणि 45 व्या मिनिटाला तर दीप ग्रेस इक्काने 38 व्या मिनिटाला गोल केले. जपानसाठी यू असाइने 20 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. (India Women Hockey Team)

सुरुवातीला क्वार्टरच्या पहिल्या पाच मिनिटांत दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केलं. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला लवकर आघाडी घेण्याची संधी मिळाली. पण वंदना कटारियाने मारलेला फटका जपानची गोलरक्षक इका नाकामुरा हिने वाचवला. पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाला यश मिळाले नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने चांगली सुरुवात करून दोन मिनिटांत दोन संधी निर्माण केल्या, मात्र गोल होऊ शकला नाही. 20व्या मिनिटाला असाईने दिलेल्या पेनल्टी कॉर्नरवर जपानने आघाडी घेतली. काउंटर अॅटॅकमध्ये भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला मात्र गोल झाला नाही. हाफ टाईमपूर्वी नवनीतने बरोबरीचा गोल केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने अतिशय आक्रमक सुरुवात करत सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, पण पुन्हा एकदा संधी हुकली. मात्र, यादरम्यान दीप ग्रेस इक्काने आणखी एका पेनल्टी कॉर्नरमध्ये आणखी एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये नवनीतने दुसरा गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये जपानने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर भारतीय संघाने हा सामना 3-1 अशा फरकाने खिशात घातला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT