Womens T20 World Cup 2024  Saam tv
क्रीडा

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आयसीसी वुमेन्स टी२० वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वुमेन्स टी२० वर्ल्ड कप स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र, तेथील परिस्थितीमुळे या स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत बांगलादेश आणि स्कॉटलँडमध्ये पहिला सामना होणार आहे.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरोधात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २३ सामने होणार आहेत. ही स्पर्धा ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यंदा सेमीफायनल आणि फायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

२ गटात संघाचं विभाजन

यंदा या स्पर्धेत १० महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे. या १० महिला संघांना दोन गटात विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, न्यूजीलंड, पाकिस्तान, श्रीलंका या संघाचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड या संघाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेत अतितटीचे सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघात टॉपवर राहणाऱ्या दोन संघ सेमीफायनलमध्ये पात्र होणार आहेत. सेमीफायनल सामना हा दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. यंदा वुमेन्स टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत चषक जिंकणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सुधारीत वेळापत्रक जाहीरत होताच भारताच्या क्रिकेट चाहत्यांनी भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT