Champions Trophy 2025 Ind Vs Pak X (Twitter)
Sports

Ind Vs Pak : "भारताकडून हरलो तरी चालेल पण.." चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानचा खेळाडू काय म्हणाला? VIDEO

Champions Trophy 2025 Ind Vs Pak : २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान आगाने भाष्य केले आहे.

Yash Shirke

चॅम्पियन्स ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. १९ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान हे आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर होण्याआधी पाकिस्तान संघाच्या उपकर्णधाराने केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान आगाने भाष्य केले आहे. 'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करण्यापेक्षा ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे', असे सलमानने म्हटले आहे. त्याने ट्रॉफी जिंकण्याच्या पाकिस्तानच्या क्षमतेवर विश्वास देखील व्यक्त केला आहे.

'भारत-पाकिस्तान सामना अन्य सामन्यांपेक्षा वेगळा असतो. हा जगातला सगळ्यात महत्त्वपूर्ण सामना आहे असे म्हटले जाते. खरंतर तो फक्त एक सामना आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना जिंकण्यापेक्षा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या विरुद्धचा सामना जिंकलो आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नाही तर फायदा नाही. आम्ही भारताकडून हरलो.. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर माझ्या मते ती सर्वात मोठी गोष्ट आहे", असे वक्तव्य पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान आगाने म्हटले आहे.

'पाकिस्तानकडे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असल्याने मी फार उत्साही आहे. लाहोरचा असल्यामुळे, माझ्याच शहरात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे माझे स्वप्न आहे. पाकिस्तानकडे ट्रॉफी जिंकण्याची क्षमता आहे', असे विधान सलमान आगाने केले आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Om Bhutkar wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचुप उरकलं लग्न?; बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

e-challan : तुम्हाला चुकून ई-चालान आलंय, ऑनलाइन कॅन्सल करता येईल का आणि ते कसं ? वाचा सविस्तर

Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मोठा धक्का! 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

SCROLL FOR NEXT