Shreya Maskar
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी, तुमचा आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
अजमोद केवळ वजनच कमी करत नाही तर पोटावरील चरबी देखील कमी करते. तुम्ही यासाठी अजमोदचे पाणी वापरू शकता. अजमोद एक कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या.
दालचिनी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दालचिनी आणि मध एकत्र खाल्याने पोटावरील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत मिळते. आठवड्यातून १-२ वेळा तुम्ही असे करू शकता.
चयापचय क्रिया सुधारण्यासाठी १ चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी ते पाणी उकळा आणि कोमट असतानाच रिकाम्या पोटी प्या.
चरबी कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करण्यासाठी, पाण्यात ठेचलेले आले उकळा आणि त्यात ताज्या लिंबाचा रस, थोडे मध मिसळा.
पांढरा ब्रेड आणि मैद्याऐवजी गव्हाचे पीठ किंवा ब्राऊन राईसचा आहारात समावेश करा.
साखर न घातलेला ग्रीन टी प्या. त्यातील प्रभावी अँटीऑक्सिडंट्स चरबी साचण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.