Viral Video : काळी मांजर आडवी गेली अन् पाकिस्तानने खेळच थांबवला, मैदानात नेमकं काय झालं? पाहा VIDEO

NZ Vs Pak : काल कराचीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये ट्राय सीरीज मालिकेतला अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये एका काळ्या मांजरीच्या एन्ट्रीची चर्चा होत आहे. या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nz vs pak cat viral video
Nz vs pak cat viral videoSaam Tv
Published On

NZ Vs PaK Viral Cat Video : अवघ्या काही दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेचा सराव म्हणून पाकिस्तानमध्ये 'दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान' यांमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिका खेळवली गेली. मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने आले. हा सामना न्यूझीलंडने आरामात जिंकला. पण त्यांच्या विजयापेक्षा एका मांजरीमुळे या सामन्याची अधिक चर्चा झाली.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये एक काळी मांजर क्रिकेटच्या मैदानामध्ये शिरली. या मांजरीमुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. हिरव्याशार मैदानात काळ्या मांजरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा डॅनी मॉरिसन हे समालोचन करत होते. त्यांनी गमतीने काळी मांजर ही ब्लॅक कॅप्सना (थोडक्यात न्यूझीलंडच्या संघात) सामील झाली आहे असे विधान केले.

ही काळी मांजर थोडा वेळ मैदानामध्ये होती. पुढे व्हिडीओमध्ये एका पक्षाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. पक्षाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मांजरीने मैदानातून पळ काढला. व्हिडीओच्या शेवटी ती काळी मांजर सीमारेषेच्या पार गेल्याचे दिसते. या गदारोळामुळे सामना थोड्या वेळासाठी थांबला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या काळ्या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Nz vs pak cat viral video
CT Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफीत हरलेले संघही होणार मालामाल, किती मिळणार बक्षीस? वाचा

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना काल कराचीमध्ये खेळवला गेला. या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २४२ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानचा पराभव करुन न्यूझीलंडने तिरंगी मालिकेवर आपले नाव कोरले.

Nz vs pak cat viral video
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत, ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंड संघालाही तगडा झटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com