IND vs NZ 2nd T20I 
Sports

IND vs NZ: दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरची एंट्री? या खेळाडूचं स्थान धोक्यात, पाहा संभाव्य प्लेईंग 11

IND vs NZ 2nd T20I: भारत आणि प्रतिस्पर्धी संघ यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी प्लेइंग ११ बाबत चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात बदल होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वनडे सिरीजनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता पाच सामन्यांची T20 सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर दुसरा सामना आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या T20I मध्ये ४८ रन्सने दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारताचं लक्ष्य या सामन्यात २-० अशी आघाडी घेण्याकडे असणार आहे.

कसं आहे रायपूरचं पीच?

रायपूरचं हे मैदान अजूनही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तुलनेने नवं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर फक्त एकच पुरुषांचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात भारतीय टीमने एकूण १७४ रन्स डिफेंड केले होते.

रायपूरचं पीच गोलंदाजांना सुरुवातीला चांगला बाऊंस देणार आहे. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. दरम्यान सामना जसजसा पुढे जाईल तशी खेळपट्टी थोडी स्लो होऊ शकते. अशावेळी फलंदाजांना जलद गतीने रन्स करण्यास मदत होणार आहे.

प्लेईंग ११ मध्ये श्रेयसला संधी मिळणार?

इशान किशन बऱ्याच काळानंतर भारतीय टी-२० टीममध्ये परतला. मात्र पहिल्या टी-२० सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्याला केवळ ८ रन्स करता आले. अशावेळी दुसऱ्या सामन्यात इशानला संधी मिळणार का हा प्रश्न आहे. कारण भारताकडे श्रेयस अय्यरचा पर्याय देखील आहे. इशान तिलक वर्माच्या जागी पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय टीममद्ये स्थान देण्यात आलंय.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग XI

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

न्यझीलंडची संभाव्य प्लेइंग XI

टिम रॉबिन्सन, डेवोन कॉन्वे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जॅकब डफी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google search: गुगलवर सर्वात प्रथम कोणता शब्द सर्च केला गेला?

अवघ्या 150 रुपयांत माजी आमदारांच्या कन्येचा विवाह; शाही खर्च टाळून शिक्षकांना 30 लाखांची मदत

Office Hairstyles: ऑफिससाठी झटपट रेडी व्हायचय? या आहेत 5 मिनिटांत होतील अश्या 5 हेअरस्टाईल्स

Atta Noodles Recipe : मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी अन् पौष्टिक आटा नूडल्स, वाचा रेसिपी

Chaibasa News : ३६ तासांपासून धुमश्चक्री, जवान तुटून पडले, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा

SCROLL FOR NEXT