Will rain interrupt the India-New Zealand world cup 2023 match dharamsala weather rain forecast Saam TV
क्रीडा

IND vs NZ Match: भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Satish Daud

IND vs NZ Match Latest Update

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन धरमशाला मैदानावर दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या हायव्होल्टेज सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार याकडेचं क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अशातच सामन्याआधी क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.  (Latest Marathi News)

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्याला विलंब होण्याची शक्यता आहे. कारण, हवामान खात्याने आज धरमशाला येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्याने सांगितलं आहे. जर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. तर क्रिडाप्रेमींचा हिरमोड होऊ शकतो.

आतापर्यंत वर्ल्ड कप २०२३ मध्ये एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही. मात्र, याच मैदानावर मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी पाऊस झाला होता. त्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ४३ ओव्हरचा खेळवण्यात आला होता. आता भारत-न्यूझीलंड सामन्यात पाऊस होणार का? झाला तर किती होईल, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा संघ

टॉम लॅथम (कर्णधार), केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT