Ind vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. आधी बंगळुरुत आणि मग पुण्यात झालेल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात येऊन कसोटी मालिका आपल्या नावावर केली. मालिकेतील तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
केन विलियम्सन पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला सुरुवातीचे २ सामने खेळता आले नव्हते. मात्र त्याच्या अनुपस्थितीतही न्यूझीलंडने सुरुवातीचे २ सामने जिंकले आहेत. सुरुवातीचे २ सामने जिंकल्यानंतर केन विलियम्सन तिसऱ्या सामन्यासाठी भारतात परतणार, असं वाटलं होतं. मात्र तो तिसऱ्या सामन्यातही परतणार नसल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.
भारतीय संघाविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी केन विलियम्सनचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. तो तिन्ही सामन्यांसाठी फिट होऊ शकलेला नाही.
त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीसाठी भारतात येणार नाहीये. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याच्या मांड्यांमध्ये वेदना जाणवल्या होत्या. त्यामुळे तो संघातून बाहेर पडला होता.
न्यूझीलंडला केन विलियम्सनबाबत कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे तो सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतात आला नव्हता. आता जरी तो दुखापतीतून सावरला असला, तरीदेखील कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यातूनही विश्रांती देण्यात आली आहे. इथून पुढे न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. आता त्याला या मालिकेसाठी फिट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, विल ओ'रौरके, डेवॉन कॉनव्हे, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, बेन सिअर्स, टीम साऊदी, विल यंग, मार्क चॅपमन, ईश सोढी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.