Gautam Gambhir hardik pandya saam tv
Sports

Gautam Gambhir: टीम इंडियाच्या कामी येणार गौतम गंभीरची चाणक्य नीती? तब्बल ६ वर्षांनी 'हा' खेळाडू टेस्टमध्ये करू शकतो कमबॅक

Gautam Gambhir: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. तब्बल सहा वर्षांनंतर टीम इंडियामध्ये एक खेळाडू कमबॅक करण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने टेस्ट फॉर्मेटमध्ये देखील चांगली सुरुवात केली आहे. बांगलादेशाविरूद्ध झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. अशातच टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. तब्बल सहा वर्षांनंतर टीम इंडियामध्ये एक खेळाडू कमबॅक करण्याची शक्यता आहे.

Gautam Gambhir देणार का या खेळाडूला संधी?

बांगलादेशाविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी चांगली दिसून आली. दरम्यान बांगलादेशनंतर भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सिरीज खेळायची आहे. स्पोर्ट्स तकच्या अहवालानुसार, टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये या फॉरमॅटमध्ये कमबॅक करू शकतो. 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे.

न्यूझीलंडची टीम IND विरुद्ध NZ टेस्ट सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सिरीजमधील दुसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तर तिसरी आणि शेवटची टेस्ट मुंबईच्या वानखेडेवर होणार आहे.

याशिवाय अजून एका अहवालात असा दावा करण्यात आलाय की, हार्दिक पांड्याला देखील रणजी ट्रॉफी 2024 खेळण्यास सांगण्यात आलंय. अशा परिस्थितीत भारतीय निवड समिती त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी तयार करत असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हार्दिक ठरणार फायदेशीर

आगामी काळात भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी रंगणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ही सिरीज रंगणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्याच्यामुळे टीमची फलंदाजी आणि गोलंदाजीची फळी मजबूत होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात हार्दिकचा टेस्ट टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT