India vs South Africa 4th T20I saam tv
Sports

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

India vs South Africa 4th T20I Playing 11 Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सिरीजमध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या सामन्यात भारताला सीरिज जिंकण्याची संधी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-२० सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील चौथा सामना आज लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांची या सामन्यावर नजर असणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर भारत सिरीज आपल्या नावे करणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सॅमसन बाहेर आणि बुमराहवर प्रश्नचिन्ह

चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये संजू सॅमसन स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे अक्षर पटेल बाहेर झाला असल्याने कुलदीप यादव आणि वरूण या दोघांनाही संधी मिळू शकते. दुसरीकडे जसप्रीत बुमराहचं कमबॅक होणार का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. जर बुमराह आजच्या सामन्यात परतला तर प्लेईंग ११ चं कॉम्बिनेशन काहीसं कठीण होण्याची शक्यता आहे.

अशामध्ये वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवच्या जागी संधी मिळू शकते. काही खाजगी कारणांमुळे जसप्रीत बुमराह धर्मशालामध्ये खेळत नव्हता. सामन्यापूर्वी टीम इंडियाचा खेळाडू शिवम दुबेने तो उपस्थित असल्याचं सांगितलं होतं. मात्र बीसीसीआयद्वारे शेअर केलेल्या फोटोंमध्ये बुमराह दिसत नाहीये.

दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता

धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कोणताही स्पेशलिस्ट स्पिनर खेळवला नव्हता. मात्र आजच्या सामन्यात कर्णधार एडन मार्करम जॉर्ज लिंडे किंवा केशव महाराज यापैकी एकाचा टीममध्ये समावेश करू शकतो.

कशी असू शकते दोन्ही टीम्सची प्लेईंग ११

भारत

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका

रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे/केशव महाराज, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओथनील बार्टमन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT