WI vs SA saam tv
Sports

WI vs SA, T20I Series: दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ! वेस्टइंडीजकडून 3-0 ने दारुण पराभव

West Indies vs South Africa 3rd T20I: वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या ३ टी-२० सामन्यांच्या शेवटच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत घरच्या मैदानावर खेळताना वेस्टइंडीजचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही वेस्टइंडीजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका ३-० ने खिशात घातली आहे.

मालिकेतील तिसरा सामना त्रिनिदादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली होती.

या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना १३-१३ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यातही शानदार कामगिरी करत वेस्टइंडीजने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वेस्टइंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला १३ षटकअखेर १०८ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स चमकला. त्याने १५ चेंडूत ४० धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार खेचले.

वेस्टइंडीजचा शानदार विजय

वेस्टइंडीजला हा सामना जिंकण्यासाठी १०९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत २२ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना आपल्या नावावर केला.

या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शाई होपने शानदार सुरुवात करुन देत २४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ४२ धावांची खेळी केली. त्यानंतर शिमरोन हेटमायरने १७ चेंडूत ३१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT