WI VS PAK  twitter
Sports

PAK vs WI: मुल्तानमध्ये इतिहास घडला! वेस्टइंडिजने पाकिस्तानला घरात घुसून हरवलं

West Indies Beat Pakistan: वेस्टइंडिज आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

पाकिस्ताननेक कसोटी मालिका जिंकण्यासाठी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार केली. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिलं. फिरकी गोलंदाजीच्या बळावर त्यांनी गेल्या ३ सामन्यात विजय मिळवला.

मात्र मुल्तान कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात वेस्टइंडीजने १२० धावांनी पाकिस्तानला धूळ चारली आहे. यासह ३४ वर्षांनी पाकिस्तानला पाकिस्तानात खेळताना पराभूत केलं आहे.

यासह २ कसोटी सामन्यांची मालिका १-१ च्या बरोबरीस समाप्त झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने शानदार खेळ करत विजयाची नोंद केली होती. आता दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी शानदार खेळ करुन मालिका बरोबरीत आणली. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १६३ धावांवर आटोपला होता. वेस्टइंडिजकडून फलंदाजी करताना गुडाकेश मोतीने ५५ धावांची खेळी केली. तर वॉरिकनने ३६ धावा केल्या. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.

वेस्टइंडिजचा डाव लवकर आटोपल्यानंतर पाकिस्तानकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. पाकिस्तानचा डाव अवघ्या १५४ धावांवर आटोपला. एकट्या रिझवानने ४९ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी चांगलाच हल्ला चढवला आणि २४४ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावांचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानचा संघ १३३ धावांवर आटोपला. वेस्टइंडिजकडून गोलंदाजी करताना वॉरिकनने ५ गडी बाद केले. तर सिक्लेयरने ३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT