Sakshi Sunil Jadhav
उपवासाच्या दिवशी पोटासाठी हलकं आणि चविष्ठ अशी वरईची खिचडी तुम्ही झटपट तयार करू शकता.
आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही साबुदाणा खिचडी न करता झटपट वरईचा भात तयार करू शकता.
साजूक तूप, हिरव्या मिरच्या, रताळे, मीठ, खोबरं, शेंगदाणे
एका कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या घाला.
आता त्यामध्ये रताळ्याचा किस छान परतून घ्या.
आता वरई, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करा.
आता त्यामध्ये पाणी आणि किसलेलं खोबरं घालून झाकण ठेवा.
खिचडी मऊसुत आणि त्यातले पाणी सुकले की उपवासाच्या दिवशी खिचडी सर्व करा.