Suryakumar Yadav angry with Ishan Kishan saam tv
Sports

IND vs NZ: सूर्याला इशान किशनचा राग का आला होता? सामन्यानंतर भारताच्या कर्णधाराने केला खुलासा

Suryakumar Yadav angry with Ishan Kishan: नुकत्याच झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने ईशान किशनवर राग व्यक्त केला. सामन्यानंतर यादवने यामागचे कारण स्पष्ट केले.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी रायपूरमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा टी-२० सामना खेळण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान खेळी करत ७ विकेट्सने सामना जिंकला. यासह, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीमने पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली. दरम्यान या सामन्यात सूर्याची बॅट देखील तळपली.

सूर्याची बॅट अखेर तळपली

टीम इंडियाच्या टी-२० फॉर्मेटचा कर्णधार सूर्याने १४ महिने आणि २३ डावांनंतर अर्धशतक झळकावलंय. त्याचा मागील अर्धशतक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये त्याने बांगलादेशाविरूद्ध झळकावलं होतं. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १२२ रन्सची पार्टनरशिप केली. दरम्यान इशानने ३२ चेंडूंमध्ये ७६ रन्सी खेळी केली.

भारताची सुरुवात झाली खराब

या सामन्यात भारताने सहा रन्समध्ये दोन विकेट्स गमावल्या होत्या. संजू सॅमसन सहा रन्स आणि अभिषेक शर्मा शून्यावर माघारी परतले होते. तरीही इशान किशनने त्याचा खेळ सोडला नाही. त्याने येताच मोठे शॉट्स मारले आणि फक्त २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. इशानने पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेतला.

दरम्यान सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्याला इशानचा राग आला होता. इशान किशनवर त्याला कशाचा राग आला हे उघड केलंय. त्याने त्याच्या फॉर्मबद्दल आणि टीममधील वातावरण कसं आहे हे सांगितलंय.

सूर्याला कशाचा राग आला होता?

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "ईशान किशनने दुपारच्या जेवणात काय खाल्लं हे मला माहित नाही. पण ६ रन्समध्ये २ विकेट गमावल्यानंतर पॉवरप्लेमध्ये मी कधीही कोणालाही ६० पेक्षा जास्त रन्स काढताना पाहिलं नाही. आपल्या फलंदाजांनी मोकळेपणाने खेळावं अशी आपली इच्छा आहे. तो मला पॉवरप्लेमध्ये स्ट्राईक देत नव्हता याचा मला राग आला होता. पण मी परिस्थिती समजून घेतली आणि खेळलो."

सूर्या पुढे म्हणाला की, मी नेटमध्ये चांगली फलंदाजी केली. ज्यावेळी न्यूझीलंडने २ बाद ११० रन्स केले तेव्हा मला वाटलं होतं की, स्कोर २३० पेक्षा जास्त असेल परंतु सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला सध्या आनंद वाटत असून टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highest Mileage Cars: भारतात विकल्या जाणारी सगळ्यात जास्त मायलेजची कार कोणती?

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Back Acne Skin: पाठीवरच्या पिंपल्समुळे त्रस्त आहात? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

Young Heart Attack: दररोज ५ किमी धावतो, ना सिगारेट ना फास्टफूड, तरीही हृदयात २ स्टेंट्सची गरज, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Hardik Pandya: भर मैदानात राडा! हार्दिक पंड्या-मुरली कार्तिकमध्ये जोरदार भांडणं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

SCROLL FOR NEXT