KL Rahul Viral Video saam tv
क्रीडा

KL Rahul : पंत आऊट नसतानाही फलंदाजीसाठी का उतरत होता केएल राहुल? चूक लक्षात येताच राहुलने केलं असं की...!

Surabhi Kocharekar

चेन्नईच्या चेपॉक मैदानात बांग्लादेश विरूद्ध भारत यांच्यामध्ये सामना खेळवला जातोय. या सामन्याचा निकाल आजच्या दिवशी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान टीम इंडियाच्या दुसर्‍या डावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने उत्तम खेळी केली. १०९ रन्सच्या त्याच्या या खेळीमध्ये १३ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. दरम्यान पंत फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंचा एकच हशा पिकला.

केएल राहुलची गमतीशीर घटना कॅमेरात कैद

पंत फलंदाजी करत असताना के.एल राहुलकडून अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शाकिब-अल-हसनच्या गोलंदाजीवर कर्णधार नझमुल हसन शांतोने पंतचा सोपा कॅच सोडला. त्यावेळी पंतचं शतक पूर्ण झालं नव्हतं. त्याचवेळी ही घटना घडली.

केएल राहुल त्याच्या खुर्चीवरून उठला आणि..

त्यावेळी टीम इंडियाची ४९ वी ओव्हर सुरु होती. या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर ऋषभ पंतने स्लॉग स्वीप शॉट खेळला. मात्र यावेळी बॉल अधिक काळ हवेत राहिला, अशातच शांतोने त्याचा कॅच पकडला. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला आगामी फलंदाज केएल राहुल खेळण्यासाठी खुर्चीवर वरून उठला. मात्र शांतोने पंतचा कॅच सोडला आणि के एल राहुल पुन्हा त्याच्या जागेवर बसला.

केएल राहुलला वाटलं की, पंतची विकेट गेली. त्याने तो फलंदाजीसाठी मैदानात येत होता. मात्र कॅच सोडल्याने पंत आऊट झाला नाही. ही बाब लक्षात येताच फलंदाजीसाठी उतरण्याच्या विचारात असलेला केएल राहुल पुन्हा जागेवर बसला.

सिराजला हसू आवरेना

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी केएल राहुलच्या बाजून ड्रेसिंग रूममध्ये मोहम्मद सिराज बसला होता. केएलची झालेली फजिती पाहून सिराज तोंडावर हात ठेऊन जोर जोरात हसत होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन फळ विक्री; डोबिंवलीत विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, VIDEO

IND vs BAN: रोहितने मोडला सचिनचा महारेकॉर्ड! धोनीलाही सोडलं मागे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी ठरणार? कोणत्या पक्षाला किती जागा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Box Office India: या बॉलिवूड स्टारच्या चित्रपटांचा परदेशातही बोलबाला

RRB NTPC Recruitment 2024: बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; रेल्वेमध्ये ३४४५ पदांसाठी भरती, अर्ज नोंदणी सुरू

SCROLL FOR NEXT