Virat kohli
Virat kohli saam tv
क्रीडा | IPL

Virat Kohli: विराटने का घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? स्वतःच सांगितलं खरं कारण

Ankush Dhavre

Virat kohli on captaincy: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२१ स्पर्धा झाल्यानंतर आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. याच वर्षी त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आता त्याने कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

विराट कोहलीचा मोठा खुलासा..

विराट कोहलीने बरेच वर्ष आरसीबी संघाचे नेतृत्व केले. मात्र २०२१ मध्ये त्याने या संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. (Latest sports updates)

२०१७ आणि २०१९ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी होता.

विराटने आरसीबीच्या महिला संघातील खेळाडूंसोबत संवाद साधताना म्हटले की, 'जेव्हा माझा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत होता, तेव्हा खरं सांगायचं तर मला स्वत:वर फारसा विश्वास नव्हता. माझ्या मनात कोणतीही भावना उरली नव्हती.हा माझा स्वतःचा दृष्टीकोन होता, एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला सांगत होतो की मी पुरेसे चढ-उतार पाहिले आहेत, मी ही जबाबदारी पार पाडू शकत नाही.'

आरसीबीने २०१६ नंतर २०२० मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र एकदाही या संघाला जेतेपद मिळवता आले नव्हते.

यावेळी विराट कोहली जोरदार फॉर्ममध्ये आहे. तर फाफ डू प्लेसी आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

त्यामुळे कर्णधार म्हणून नव्हे तर एक खेळाडू म्हणून विराट आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT