भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

Maharashtra Politics: प्रखर हिंदुत्ववादाचा दावा करणाऱ्या भाजपनं सत्तेसाठी थेट एमआयएमशी युती केल्यानं मोठी खळबळ माजलीय. नेमक्या नगरपालिकेत भाजपनं एमआयएमशी घरोबा केलाय? याचे काय पडसाद उमटले आहेत ? पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Politics
BJP–AIMIM alliance in Akot sparks massive political controversy as debates over ideology and power intensify in Maharashtra politics.saam tv
Published On
Summary
  • अकोट नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युतीमुळे मोठी खळबळ

  • विचारधारेवर पाणी सोडल्याचा विरोधकांचा आरोप

  • अंबरनाथमध्ये काँग्रेससोबतचे सहकार्यही चर्चेत

राज्यात हिंदुत्ववादाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजपनं अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी नवा पॅटर्न स्विकारलाय. विचारधारेवर पाणी सोडून भाजपनं अकोट विकास मंचच्या माध्यमातून थेट एमआयएमशी युती केली. इतकचं काय तर काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या देणाऱ्या भाजप नेत्यांनी अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबतच हातमिळवणी केल्यानं भाजपच्या छुप्या युतीवरून विरोधकांनी चांगलचं रान उठवलंय.

Maharashtra Politics
मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यात हिंदुत्ववादाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजपनं अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी नवा पॅटर्न स्विकारलाय. विचारधारेवर पाणी सोडून भाजपनं अकोट विकास मंचच्या माध्यमातून थेट एमआयएमशी युती केली. इतकचं काय तर काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या देणाऱ्या भाजप नेत्यांनी अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबतच हातमिळवणी केल्यानं भाजपच्या छुप्या युतीवरून विरोधकांनी चांगलचं रान उठवलंय.

Maharashtra Politics
Maharashtra Corporation Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीत रक्ताचा सडा, खोपोली पाठोपाठ अकोल्यातही हत्याकांड

या वादानंतर अकोट आणि अंबरनाथमधली युती तोडल्याचं जाहीर करण्यात आलं. नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कट्टर वैरी निवडणुकीसाठी एकत्र आल्याचं तुम्ही पाहिलं. मात्र आता विचारधारा, राजकीय नितीमत्ता सोडून एकमेकांचे विरोधक एकत्र आल्यामुळेच राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय. त्यामुळे या युतीचे राजकीय पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com