

महाराष्ट्रातील निवडणूक वातावरणात वाढता हिंसाचार
खोपोलीनंतर अकोल्यात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या
राजकीय वैमनस्यामुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
हा संताप आहे. अकोल्य़ातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येनंतरचा. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या हिदायत पटेल यांची भररस्त्यात हत्या करण्यात आली आणि त्याला कारण ठरलयं. राजकीय वैमनस्य. होय, हिदायत पटेल नमाज पठण करून मशिदीच्या बाहेर पडले. आणि त्याचं वेळी एका तरुणानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. आणि महापालिकेच्या निवडणुकीत रक्ताचा सडा पडला.
पटेल हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 6 आरोपींवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. राजकीय आखाड्यात मिर्झापूर स्टाईल हे पहिलचं हत्याकांड नाही. याआधीही खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेचे पती मंगेश काळोखेंची सकाळी सापासप वार करून हत्या केली. यामागे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केला. तर दुसरीकडे सोलापूरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची उमेदवारी मागे घेण्याच्या वादातून निघृण हत्या करण्यात आली. त्यावरून अमित ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणाची पंरपरा आहे... मात्र आधी नगरपालिकेला आणि आता महापालिका निवडणुकीला रक्तरंजित वळण मिळाल्यानं महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेनं सुरुय का?असाच प्रश्न निर्माण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.