rohit sharma on shubman gill  google
Sports

Rohit Sharma: गिलला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला का पाठवतात? रोहितच्या रोखठोक उत्तराने खळबळ

Rohit Sharma On Shubman Gill: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement On Shubman Gill:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल हा २०२३ वर्षातील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

सध्या कसोटी क्रिकेटमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. त्याच्या फलंदाजीक्रमात बदल केल्यापासून त्याच्या कामगिरीतही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर केल्यानंतर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर गिल पूर्णपणे फ्लॉप..

शुभमन गिलने जेव्हापासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. तेव्हापासून तो फ्लॉप ठरतोय. गेल्या ५ इंनिंगमध्ये त्याला ६,१०,२९, २ आणि २६ धावा केल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'शुभमन गिलला आधीपासूनच तिसऱ्या क्रमांकावर खेळायचं होतं.'

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्मा म्हणाला की,'शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला खूप आवडतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शुभमन गिल याच क्रमांकावर फलंदाजी करतो. गिलने वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात केली आहे. मात्र त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याला अधिक प्राधान्य दिलं आहे. सलामीला फलंदाजी करणं आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं यात फारसा फरक नाही. कारण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज फलंदाजीला येण्यासाठी केवळ १ चेंडूंची गरज असते. शुभमन गिल आणि हुशार आहे.' (Latest sports updates)

चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत शुभमन गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र तो या क्रमांकावर खेळताना अजुनपर्यंत तरी हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्याने अशीच कामगिरी सुरु ठेवली तर त्याचा कसोटी संघातून पत्ता कट होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT