sanju samson with virat kohli saam tv news
Sports

Sanju Samson: आठ वर्षे अन् केवळ ३७ सामने;संजू सॅमसनला संधी न मिळण्याचं नेमकं कारण काय?

Team India News: संजू सॅमसनला भारतीय संघात संधी का दिली जात नाही.

Ankush Dhavre

Sanju Samson News:

आक्रमक फलंदाज,उत्कृष्ट यष्टिरक्षक असून सुद्धा संजू सॅमसनला नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. नुकताच BCCI ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

या संघात संजू सॅमसनला स्थान दिलं गेलं नाही. याष्टिरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन आणि जितेश शर्मा यांना पसंती दिली गेली आहे. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला आतापर्यंत केवळ ३७ सामने खेळता आले आहेत.

उत्कृष्ट यष्टिरक्षण आणि आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संजू सॅमसन अनेकदा संघाबाहेर राहिला आहे. यावेळी देखील त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नाही. तो यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. या सामन्यात त्याने २६ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला होता. (Sanju Samson)

आठ वर्षे अन् केवळ ३७ सामने...

संजू सॅमसनने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. गेल्या आठ वर्षांत त्याला केवळ ३७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचं संघात आत बाहेर होणं सुरूच असतं. त्याला आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध जास्त सामने खेळण्याची संधी मिळत नाही.

कदाचित हेच कारण असावं की, संजू सॅमसन मोठ्या स्तरावर फ्लॉप ठरतोय. संजू सॅमसनबद्दल बोलायचं झालं तर तो फलंदाजी, यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षणातही संघासाठी मोलाचं योगदान देतो. सध्या ईशान किशन आणि जितेश पाटील यांना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं जातं आहे. (Latest sports updates)

अशी आहे कारकीर्द..

संजू सॅमसनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १३ वनडे सामन्यांमध्ये ३९० धावा केल्या आहेत . यादरम्यान त्याने ३ अर्धशतकं झळकावली आहेत. तर २४ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३७४ धावा केल्या आहेत.

संजू सॅमसनला टी-२० क्रिकेटमध्ये केवळ १ अर्धशतक झळकावता आलं आहे. भारतीय संघासाठी खेळणं खूप कठीण आहे. मात्र संघात कमबॅक करणं त्याहून कठीण आहे. संजू सॅमसनला अनेकदा संघाबाहेर गेला आहे. आता त्याला केव्हा संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT