rohit sharma  twitter
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा कुठंय? सूर्यकुमार यादव नाणेफेकीला का आला? समोर आलं मोठं कारण

Why Rohit Sharma Not Playing: रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

MI VS KKR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रोहित शर्माऐवजी सूर्यकुमार यादव नाणेफेक करण्यासाठी आला होता. दरम्यान रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

नाणेफेक होत असताना सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रोहित शर्मा का खेळत नाहीये? अशी चर्चा सुरू झाली. रोहित शर्मा पोटदुखीमुळे या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये.

रोहित शर्मा जोरदार चांगल्या फॉर्ममध्ये होता. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ६५ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला सामना जिंकून दिला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माची कमतरता जाणवू शकते. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्स संघात महत्वाचे बदल..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पोटाच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. तर त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर नेहाल वढेराला संधी देण्यात आली आहे. तसेच अर्जुन तेंडुलकरला देखील पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स:

इशान किशन (विकेटकीप), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT