Arjun Tendulkar: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.. मुंबई इंडियन्स संघाला या हंगामातील ३ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
अर्जुन तेंडुलकरला २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली होती. आज सुरु असलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव नाणेफेक करण्यासाठी आला आणि त्याने अर्जुन तेंडुलकर खेळणार असल्याची माहिती दिली. आता अर्जुन तेंडुलकर कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Arjun Tendulkar Debut)
मुंबई इंडियन्स संघात महत्वाचे बदल..
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पोटाच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. तर त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर नेहाल वढेराला संधी देण्यात आली आहे. तसेच अर्जुन तेंडुलकरला देखील पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. (Arjun Tendulkar Record)
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
मुंबई इंडियन्स:
इशान किशन (विकेटकीप), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ
कोलकाता नाईट रायडर्स:
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.