अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून धूळ चारली. पहिल्या डावात फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाला अवघ्या ८९ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी दजदार कामगिरी केली. मग १६ धावा करणाऱ्या रिषभ पंतला सामनावीर पुरस्कार का देण्यात आला?
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असताना गुजरात टायटन्स संघाचा डाव १७.३ षटकात ८९ धावांवर आटोपला. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ९० धावांची गरज होती. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्स संघाने अवघ्या ८.५ षटकात पूर्ण केलं. त्यामुळे त्यांच्या रन रेटमध्ये मोठा फरक पाहायला मिळाला आहे. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रिषभ पंतने केवळ १६ धावा केल्या.
रिषभ पंतने फलंदाजी करताना नाबात १६ धावांची खेळी केली. यासह यष्टीरक्षण करताना त्याने २ भन्नाट झेल टिपले आणि २ स्टम्पिंगही केल्या. अपघातानंतर मैदानावर कमबॅक करत असलेल्या रिषभ पंतने फलंदाजीत आणि यष्टीरक्षणात शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. हे भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत. कारण येत्या काही दिवसांत टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
या संघात स्थान मिळवण्यासाठी रिषभ पंत प्रबळ दावेदार आहे. या सामन्यात यष्टीरक्षण करत असताना त्याने डेव्हिड मिलर आणि राशिद खानला बाद केलं. त्यानंतर त्याने शाहरुख खान आणि अभिनव मनोहरला स्टम्पिंग करत माघारी धाडलं. धावा कमी असल्याने त्याला फलंदाजीत फारसं योगदान देता आलं नाही. तर यष्टीमागे केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.