ZIM vs PAK Saam TV
क्रीडा

T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिस्टर बीन का होतोय ट्रेंड? झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही केलं ट्वीट

सोशल मीडियावर फॅन्सनी मिस्टर बीनच्या डुप्लिकेटवरून पाकिस्तानला ट्रोल केले.

साम टिव्ही ब्युरो

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात काल झिम्बाब्वेने पाकिस्तानला  (Pakistan)  मोठा धक्का दिला. पर्थ येथे झालेल्या रोमहर्षक लढतीत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी त्यांना त्यांचे सर्व सामने जिंकण्याव्यतिरिक्त इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

झिम्बाब्वेच्या विजयानंतर मिस्टर बीन सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा रिअल मिस्टर बीन नसून पाकिस्तानचा ड्युप्लिकेट आहे. सोशल मीडियावर फॅन्सनी मिस्टर बीनच्या डुप्लिकेटवरून पाकिस्तानला ट्रोल केले. झिम्बाब्वेचे राष्ट्रपती इमर्सन नंगाग्वा हे देखील यात सामील झाले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “झिम्बाब्वेसाठी हा विजय मोठा आहे! संघाचे अभिनंदन. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा.” इमर्सन नंगाग्वाच्या ट्विटला रिट्विट करत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही पाकिस्तानची फिरकी घेतली. (Cricket News)

काय आहे प्रकरण?

सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सरावाचे फोटो शेअर केले. झिम्बाब्वेचा एक यूजर Ngugi Chasura या पोस्टवर कमेंट केली. त्यांने लिहिले की, झिम्बाब्वेचा नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी ड्युप्लिकेट पाकिस्तानी बीन दाखवला होता. उद्या मैदानावर या प्रकरणाचा निकाल लावू. उद्या पाऊसच तुम्हाला वाचवो हीच प्रार्थना.

मिस्टर बीन कोण आहे?

लोकांना हसवण्यासाठी ब्रिटनचा रोवन अॅटकिन्सन मिस्टर बीनची भूमिका करतो. 2016 मध्ये हरारे येथे एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानने बनावट मिस्टर बीन बनवून एका कलाकाराला पाठवले होते. आसिफ मुहम्मद असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये मिस्टर बीनची भूमिका करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेचे चाहते त्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या 'फसवणुकीचा' बदला घेण्यासाठी 2016 पासून वाट पाहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT