IND VS PAK: पाकिस्तान विरुद्ध झेल सोडला, ट्रोलर्स म्हणाले 'खलिस्तानी', अर्शदीप सिंगने 'असा' केला कमबॅक

अर्शदीपने सिंगने चमकदार कामगिरी करून ट्रोल करणाऱ्यांची बोलतीच बंद केली, कारण...
Arshdeep Singh
Arshdeep Singhsaam tv
Published On

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगला होता. भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात झेल सोडल्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगमुळं (Arshdeep Singh) अर्शदीपची झोप उडाली होती. परंतु, टीम इंडियातील खेळाडूंनी या युवा गोलंदाजाला दिलासा देऊन पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

त्यामुळं काल रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तानच्या (India vs Pakistan) लढतीत अर्शदीपने चमकदार कामगिरी करून ट्रोल करणाऱ्यांची बोलतीच बंद केली. काही ट्रोलर्सने अर्शदीपला खलिस्तानी असंही म्हटलं होतं, मात्र, अर्शदीपने ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून कालच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांच्या नांग्या ठेचल्या. (Team india bowler Arshdeep singh latest news update)

Arshdeep Singh
IND vs PAK : 'सुंदर पिटाई'...गुगलच्या सीईओंना ट्रोल केलं, पाकिस्तानच्या चाहत्याची केली बोलतीच बंद

टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) भारत-पाकिस्तानचा सामना काल रविवारी मेलबर्नच्या मैदानात झाला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेषत: अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेऊन पाकिस्तानची पुरती दमछाक केली. भारताने सामना जिंकल्यानंतर अर्शदीपने माध्यमांशी संवाद साधला, यावेळी तो म्हणाला, भारतीय संघामध्ये खूपच चांगलं वातावरण आहे.

एकमेकांमध्ये संवाद असल्याने बाहेरच्या गोष्टींचा परिणाम होत नाहीय. आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहतो. वाईट काळात एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतो. त्यामुळे सकारात्मक उर्जा मिळते. दरम्यान, अर्शदीपने फॉर्मात असलेले पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला बाद करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.

Arshdeep Singh
Virat Kohli : पाकिस्तान विरुद्ध कोहली पाडतो धावांचा पाऊस, टी20 मध्ये 'विराट' आकडेवारी

अर्शदीप माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाला, जर तुम्ही तुमच्या खेळावर विश्वास ठेऊन आनंद घेत असाल तर आव्हानं सहज पेलता येतात. आम्ही क्रिकेटचा आनंद घेतो. आम्ही आमच्या खेळाला खूप पसंत करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या खेळाचा आनंद घेता तेव्हा तुमच्या समोर आव्हानं येत नाहीत. मी वेगळं असं काहीच केलं नाही.

मी सर्व गोष्टींना सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.मी जास्त विचार करत नाही. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या विरोधात चार षटकांमध्ये 32 धावा देत तीन विकेट घेतले.याशिवाय हार्दिक पंड्यानेही 30 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com