IND vs PAK : 'सुंदर पिटाई'...गुगलच्या सीईओंना ट्रोल केलं, पाकिस्तानच्या चाहत्याची केली बोलतीच बंद

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका युजरची बोलतीच बंद केली, कारण...
Google CEO sundar pichai tweet about india vs pakistan match
Google CEO sundar pichai tweet about india vs pakistan matchsaam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल रविवारी टी20 वर्ल्डकपचा महामुकाबला रंगला. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने चार विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहली (Virat Kohli) कालच्या सामन्यातील हिरो ठरला. 53 चेंडूत 82 धावा कुटल्यानं विराटला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. टीम इंडियाला शेवटच्या तीन षटकांमध्ये 48 धावांची आवश्यकता होती. मात्र, कोहलीच्या चौफेर फटकेबाजीमुळं भारताने सामना खिशात घातला. (Google ceo sundar pichai latest news update)

Google CEO sundar pichai tweet about india vs pakistan match
IND vs PAK T20 Cricket Betting : विराट कोहलीच्या खेळीने विदर्भातील क्रिकेट बुकी क्लीन बोल्ड

सुंदर पिचाई यांनी केलं ट्विट

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर सर्वांना (Diwali Festival) दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याचसोबत त्यांनी म्हटलं की, शेवटच्या तीन षटकांना पुन्हा पाहून मी दिवाळी साजरी करत आहे. शुभ दिवाळी,जे कुणीही याचं सेलिब्रेशन करत आहेत, त्यांची मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत चांगली वेळ असेल.मी आज पुन्हा शेवटचे तीन षटक पाहून दिवाळी साजरी केली. काय सामना होता...

पिचाई यांनी केलेल्या ट्विटनंतर एका पाकिस्तानी युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिलं, तुम्ही सुरुवातीचे तीन षटक पाहायला पाहिजेत.

Sundar Pichai tweet
Sundar Pichai tweetsaam tv

सुंदर पिचाई यांनी केली बोलतीच बंद

पाकिस्तानी युजरला प्रत्युत्तर देताना पिचाई म्हणाले, ते पण पाहिलं. भुवनेश्वर आणि अर्शदीपने काय स्पेल टाकला होता. त्यांच्या या रिप्लायला अजब उत्तर मिळत आहे.एका युजरने लिहिलं, सुंदर पिटाई..

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची दाणादाणा उडवली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक आक्रमक खेळी करून क्रिकेटविश्वात तो रनमशीन असल्याचं पुन्हा सिद्ध केलं. पाकिस्तानने भारताला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंरतु, विराट कोहलीनं पुन्हा एकदा चमत्कार करून 53 चेंडूत नाबाद 82 धावांची आक्रमक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

tweet
tweetsaam tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com